
अमळनेर- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने अमळनेर न.प.चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना लोकवर्गणी रद्दबातल व पाणीपट्टीवर व्याज आकारणी न करण्यासाठी निवेदन निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की नगरपरिषद गेल्या अनेक वर्षापासून लोक वर्गणीचे नावाखाली न.पा.करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूली करीत आहे. सदर नागरिकांवर लादलेली कर वसुली ही अन्यायकारक व बळजबरीची आहे व ती का आकारली जाते याचे कोणतेही सबळ कारण नगर परिषदेकडे नाही, म्हणून ती रद्द करण्यात यावी. सन २०२४-२०२५ या वर्षापासून पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कात आर्थिक वर्ष 31 मार्च अखेर असताना, 31 डिसेंबर पासूनच २% दराने व्याज आकारणी करीत आहे. ती अन्यायकारक व जबरदस्तीची लादलेली आहे. नागरिकांमध्ये या बाबतीत तीव्र असंतोष आहे. तरी आपण पाणीपट्टी करा (Water Cess) वरील आकारण्यात येणाऱ्या व्याज/शास्ती रद्द करावी अशी मागणी त्यात करण्यात आली.
याप्रसंगी मुख्याधिकारी नेरकर यांनी लोकवर्गणी व पाणीपट्टी वरील व्याज न आकारणे बाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी उपमुख्याधिकारी चव्हाण ग्राहक पंचायत अमळनेरच्या अध्यक्षा सौ.स्मिता चंद्रात्रे, ॲड.भारती अग्रवाल, महिला प्रांत प्रमुख, सौ.ज्योती भावसार, तालुका संघटक सौ.कपिला मुठे, कार्यकारणी सदस्य मकसूद बोहरी, जिल्हा सहसंघटक विजय शुक्ल, बँकिंग व सायबर प्रमुख सुनील वाघ, जिल्हा ऊर्जा प्रमुख अरविंद मुठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती पीआरओ सौ.मेहराज बोहरी यांनी दिली.