अमळनेर:- 23 ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर झालेल्या फ्रि स्टाईल कुस्ती स्पर्धेत अंडर 14 वयोगटातील कुस्तीचा सामना अमळनेर येथील प्रताप कॉलेज मधील इंडोअर हॉल मध्ये पार पडला, यात वेगवेगळ्या गटात रंगतदार सामने रंगले.
14 वर्ष वयोगटात प्रताप हायस्कूल चा रुद्र महेंद्र चव्हाण प्रथम क्रमांक पटकावला. त्याची जिल्ह्यावर निवड झाली आहे. यावेळी क्रीडा शिक्षक व त्याचे कोच दर्शन पाटील यांनी मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.निकम यांनी व शाळेच्या सर्व शिक्षकांनी रुद्रचे कौतुक केले.