अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील ५५ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलिसांत देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील सखाराम दगा धनगर हे १८ रोजी सकाळी ८ वाजता गावात जाऊन येतो असे सांगून निघाले, मात्र आजपावेतो परत आले नसल्याने त्यांचा मुलगा चैत्राम धनगर यांच्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महेकॉ रेखा ईशी ह्या करत आहेत.