अमळनेर:- आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे चिमनपुरी पिंपळे खु,बु ,मंगरूळ, आर्डी, आनोरे,शिरसाळे,
परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सर्वाधिक फटका कापसाला बसत असून सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर ती मर रोगाची सुरुवात व कापसाच्या झाडाच्या मुळे सडू लागल्या झाडांना बुरशी व लालसर होत आहे तरी काही शेतकऱ्यांचे मर रोगामुळे कापूस या पिकाचे नुकसान होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली बुडाल्याने नुकसान होत आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या पावसामुळे कापूस तसे मुग उडीद व कापूस या पिकाचे नुकसान होत असून मूग व उडदाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. मका आडवा पडू लागला आहे. यंदा निसर्गाने
भरभरून दिले पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला
घास हिरावला. ओल्या दुष्काळाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.