अमळनेर:- लायन्स क्लबच्या सहकार्याने अमळनेर व पारोळा तालुक्यातील फोटोग्राफर असोशियशन व त्यांच्या कुटुंबियांसाठी जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन इंदिरा भवन येथे २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील व पारोळा असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश हजारें, मनोज चित्ते, जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले.त्यावेळी ला. अध्यक्ष अजय हिंदुजा, सेक्रेटरी विनोद अग्रवाल, ट्रेझरर महेश पवार, डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ निखिल बहुगुणे, ला.योगेश मुंदडा उपस्थित होते.
पिंपळे येथील फोटोग्राफर युवराज पाटील यांच्या पत्नी लोकनियुक्त सरपंच झाल्यामुळे वर्षा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य भगवान पाटील यांनी त्यांचे वडील कै.सोमनाथ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फोटोग्राफर बांधवांच्या परिवारासाठी डिजिटल थर्मामीटरचे वितरण फोटोग्राफर बांधवाना करण्यात आले.
यावेळी डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ संदीप जोशी, डॉ.विक्रांत पाटील यांनी आरोग्याची कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. विकास पाटील, डॉ. मंजिरी कुलकर्णी,स्त्रीरोग तज्ञ डॉ. मयूरी जोशी ,डॉ.मयूरी विक्रांत पाटील, डॉ. दिनेश महाजन,नेत्ररोग तज्ञ डॉ. अमोग जोशी,जनरल फिझिशियन डॉ. मिलिंद नवसारीकर,डॉ.रवींद्र जैन,बालरोग तज्ञ डॉ. शरद बावीस्कर नाक, कान, घसा, तज्ञ डॉ. प्रियंका प्रशांत शिंदे यासह अनेक तसेच अनेक तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली.
अमळनेर व पारोळा तालुक्यातील अनेक फोटोग्राफर्स व त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचलन राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर व पारोळा तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.