अमळनेर-देशभरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनची अमळनेर येथील नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
यानुसार अमळनेर आय एम ए च्या अध्यक्षपदी साइसेवा हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ.प्रशांत शिंदे,सेक्रेटरीपदी गजानन डोळ्यांच्या हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ञ डॉ.नरेंद्र महाजन,सहसेक्रेटरीपदी योगेश्वर रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ विनोद पाटील तर ट्रेझरर पदी नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ मयुरी संदीप जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदरची निवड करण्यात आली.यावेळी जेष्ठ शल्यचिकित्सक डॉ.अनिल शिंदे,डॉ.नरेंद्र सोनवणे,मावळते सेक्रेटरी डॉ.संदीप जोशी,डॉ भूषण पाटील यासह आय एम ए चे सर्व डॉक्टर सदस्य उपस्थित होते.सर्वानी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार केला.दिलेली जवाबदारी योग्य पद्धतीने सांभाळून संघटनेसाठी सतत क्रियाशील राहण्याची ग्वाही नूतन अध्यक्ष डॉ.प्रशांत शिंदे यांनी दिली.