अमळनेर:- तालुक्यातील निम येथील ६० वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मुलाने मारवड पोलिसांत दिली आहे.
निम येथील नंदकिशोर पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचे वडील कालिदास सदाशिव पाटील (वय ६०) हे दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरून निघाले. मात्र गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला तरीही त्यांचा तपास लागला नाही. त्यामुळे मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत