अमळनेर:- येथील स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये आगामी पोळा सणानिमित्त विद्यार्थ्यांना बैलपोळ्याचे महत्त्व सांगत पोळा सण साजरा करण्यात आला.
शाळेत बैलांची जोडी आणून त्यांची पूजा करण्यात येवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. शाळेचे प्राचार्य विनोद अमृतकर यांनी बैलांची पूजा केली तसेच मुलांना बैलपोळा सण का साजरा केला जातो हे सांगत शिक्षकांनी बैलपोळ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व हा सण खेडेगावात कशाप्रकारे साजरा करण्यात येतो हे दाखवले.यात प्राथमिक विभागातील मुलांचा सहभाग होता.बैलांची जोडी पाहून विद्यार्थी फार आनंदित झाले. काही विद्यार्थी शेतकरी बनून आले होते.