स्व.श्री. एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात कार्यशाळा संपन्न
अमळनेर:- येथील स्व .श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय शाळेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली.उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाडू मातीपासून गणेश मूर्ती कशी तयार करावी. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून अतिशय आकर्षक व सुबक मूर्ती तयार केल्या व या स्पर्धेतून त्यांनी स्व :निर्मितीचा आनंद घेतला.
प्लँस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींमुळे पर्यावरण प्रदूषण होते.या मूर्ती विरघळत नाहीत व त्यांच्या विषारी रंगामुळे नदी, विहिरी व तलावाच्या पाण्यातील मासे ,इतर सजीवांना त्यामुळे होणारा जीवघेणा त्रास याविषयी मुख्याध्यापक धनराज महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या स्पर्धेत प्रथम – मोहिनी सोनवणे (१० वी), द्वितीय-खुशाल भोई (९ वी),तृतीय – प्राची महाजन (८ वी),उत्तेजनार्थ नंदिनी जाधव (८ वी),शितल जाधव (९ वी) यांना पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण उपशिक्षिका नेहा पाटील,किशोर पाटील, राजेंद्र महाजन यांनी केले .आकर्षक बनविलेल्या मूर्ती यंदाच्या गणेशोत्सवात स्वतःच्या घरी विराजमान करणार असल्याचे तसेच घरीच बादली किंवा हौदात मूर्तींचे विसर्जन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा , दैनंदिन अभ्यासाचा ताण कमी व्हावा व निसर्गाशी आपले नाते घट्ट व्हावे या उद्देशाने उपशिक्षक सुनिल पाटील यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले. शिक्षकेतर कर्मचारी धर्मेंद्र साळुंखे याचे सहकार्य लाभले.