अमळनेर:- शहरातील बाहेरपुरा भागात घरासमोर लावलेली दुचाकी भरदिवसा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अमळनेर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
शहरातील व्यावसायिक राकेश जेठवा (रा. बाहेरपुरा, उस्मानिया मस्जिदसमोर) हे २० रोजी दुपारी घरी जेवायला आले असता त्यांच्या मालकीची ३० हजार रुपये किमतीची एचएफ डिलक्स दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीबी ४३४०) घरासमोर लावली. त्यानंतर दुपारी चार वाजता सदर दुचाकी दिसून न आल्याने त्यांनी व मित्रांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे अमळनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध दुचाकी चोरी केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत.