अमळनेर पोलिसांत ॲट्रोसिटीसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथे झालेल्या हाणामारीप्रकरणी दुसऱ्या गटातर्फे तक्रार दाखल करण्यात आली असून अमळनेर पोलिसांत ॲट्रोसिटीसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रोहित संजय बिऱ्हाडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता मंगरूळ येथील कामिल हुसेन खाटीक याच्या दुकानावर मित्रांसह गेला असता भाव करण्यावरून त्यांचा वाद झाल्याने कामील हा रोहित याला जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तसेच सलीम खाटीक याने सुऱ्याने मानेवर वार केला असता रोहितने डाव्या हातावर तो वार झेलत चुकवला. हुसेन खाटीक याने लोखंडी जाळी मारल्याने त्यांच्या पाठीलाही दुखापत झाली. त्या ठिकाणावरून पळ काढून मेडिकल मेमो घेत रोहित याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात जबाब घेतल्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत