अमळनेर:- येथील कलाशिक्षक दिलीप पाटील यांना नुकतेच महाराष्ट्र ज्ञानवंत गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जनमत प्रतिष्ठान व हेमंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ज्ञानवंत गुणगौरव पुरस्कार कलाशिक्षक दिलीप पाटील यांना प्रदान करण्यात आला. माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते गौरवण्यात आले. उपस्थितीत मान्यवर भारती काळे, निशा पवार, कॅपिटल प्राईमचे संचालक चिराग लोखंडे,गणेश नहाले,कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास जोशी, निसर्ग पर्यावरण महानगरपालिकेचे वसंत पाटील, पंकज नाहाले व हेमंत भंगाळे उपस्थित होते.