
अमळनेर-सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील गुढीपाडव्या निमित्त काल 30 रोजी अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी, धार्मिक, सामाजिक संस्थांच्या व मंडळांच्या सहकार्याने भव्य नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली.

या यात्रेसाठी सर्वानी सकाळी आपले प्रांगण झाडून सळा शिंपडून रांगोळ्या काढाल्या होत्या, घरात रोषणाई करून भव्य गुढी उभारत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले,अनेक जण मंगलयेश परिधान करू या यात्रेत सहभागी झाले होते.
सदर शोभायात्रा प्रताप मिल, स्टेशन रोड येथून सुरू झाली,यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पूजन केल्यानंतर पालखी खांद्यावर घेत यात्रेला सुरुवात झाली.वाटेत ठिकठिकाणी पाणी व थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती तर यात्रेत विविध संस्था व समाजाचे सजावट केलेले रथ सहभागी झाले होते,सदर यात्रा तेथून स्वामी नारायण चौक, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, माळीवाडा, झामी चौक पोलीस चौकी, वड चौक, वाघ बिल्डींग, त्रिकोणी बगीचा, पाचपावली देवी मंदिर, कोंबडी बाजार, विजय शॉपी, पोस्ट ऑफिस, बजरंग सुपर मार्केट मार्गे प्रताप मिल मधील श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे पोहोचून रामारोप झाला.सदर यात्रेसाठी बजरंगलाल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू नववर्ष स्वागत समितीने परिश्रम घेतले.

