
अमळनेर:- विधानसभा मतदार संघासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शक्ती प्रदर्शन करत काल अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे दाखल केला.

सकाळी १० वाजेच्या सुमारास वाडी चौकात विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेऊन संत सखाराम महाराजांना अभिवादन करण्यात आले. खुल्या जिपवर शिरीष चौधरी, त्यांच्या पत्नी अनिता चौधरी, त्यांचे बंधू रवींद्र चौधरी,बहीण रेखाताई चौधरी विराजमान झाले होते. शिरीष चौधरींच्या नावाच्या घोषणाबाजी करत डीजेच्या नादात वाडी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. रॅली पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, पाचपावली देवी चौक, बसस्टँड, महाराणा प्रताप चौकातून तहसील कार्यालयापर्यंत आली. रस्त्यात सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
तहसील कार्यालयाबाहेर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी रवींद्र चौधरी, गुलाब पाटील, शिरीष चौधरी यांची भाषणे झाली. मतदार संघाचा विकास करण्यासाठी, शेतकरी,बळीराजाला न्याय देण्यासाठी शिरीष चौधरींना निवडण्याचे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण पाठक यांनी केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष नाना रतन चौधरी, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, अनिल महाजन, पंकज चौधरी,किरण गोसावी, किशोर पाटील,सलीम टोपी, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, श्रीराम चौधरी, संजय चौधरी, प्रा ई टी चौधरी, सुनील भामरे, अविनाश जाधव, नरेश कांबळे, नितेश लोहरे यांच्यासह अमळनेर, पारोळा तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते.

