निमगव्हाण ग्रामस्थ भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज…
अमळनेर:- तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील धुनीवाले दादाजी दरबारात श्री स्वामी भक्तानंद गुरु देवानंद परमहंस यांची ४३ वी पुण्यतिथी सोहळा सालाबादाप्रमाणे २९ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले कार्यक्रमासाठी निमगव्हाण ग्रामस्थ भाविक भक्तांसाठी सज्ज आहेत.
सकाळी – ६ ते ७ पूज्य स्वामीजींचा समाधीचा अभिषेक, ८ ते १२ निशान व पालखीची मिरवणूक, दुपारी – १२ते १ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी -१ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री – ८ ते ९ आरती व नामस्मरण, ९ ते १० मशाली व निशान प्रदक्षिणा, १० ते १२ वाजेपर्यंत भजन नामस्मरण कार्यक्रम, अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. पूज्य स्वामीजींच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबादप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व भाविक भक्त जणांनी सोहळ्याप्रसंगी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष व विश्वस्त मंडळ स्वामी भक्तांनंद गुरू रेवानंद परमहंस श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान निमगव्हाण तालुका चोपडा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.