
२० कोटींचे आहेत कर्ज, उमेदवारी दाखल करताना प्रतिज्ञापत्रात केले नमूद…
अमळनेर:- माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची चल आणि अचल अशी एकूण संपत्ती ५० कोटी ४६ लाख ७४ हजार २०८ रुपये असून त्यांच्यावर २० कोटी ७७ लाख ९९ हजार ३१० रुपये कर्ज आहे.

शिरीष चौधरी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात फक्त त्यांच्याजवळ हातात रोख २२ लाख ३० हजार ७२० रुपये तर बँकांमध्ये ३४ लाख ४९ हजार ७०६ रुपये तसेच शेअर्सच्या रूपाने ३३ लाख ९३ हजार ७९४ रुपये आणि त्यांच्या नावावर तीन मोटारसायकली ,तीन कार ,एक ट्रॅक्टर , त्यांच्याजवळ ३१ लाख २० हजार रुपयांचे ४० तोळे सोने आहे. त्यांच्यावर दोन गुन्हे प्रलंबित आहेत. जमीन मालमत्ता अशी संपत्ती २७ कोटी ५६ लाख १९ हजार २१२ रुपये आहे. त्यांच्यावर दंगल,हाणामारी, धमकी, शिवीगाळ, दमदाटी, पिस्तुलचा धाक, समाजाबाहेर टाकणे आदि प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. असे त्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

