गेल्या १५ वर्षात शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळातच पाडळसरेसाठी सर्वात कमी निधी मंजूर…
अमळनेर:- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या पाडळसरे धरणासाठी मागील पंधरा वर्षात अर्थसंकल्पात सर्वात कमी निधी मंजूर शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. त्यांच्या कार्यकाळात एक वर्षभर ह्या प्रकल्पाचे कामच ठप्प पडले होते. त्यामुळे शेतीला पाणी देऊ म्हणणाऱ्या माजी आमदारांना निधी आणता येत नाही हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
अमळनेरसह आजूबाजूच्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचा सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा विषय असलेल्या पाडळसरे धरणासाठी अर्थसंकल्पात मागील पंधरा वर्षात एकूण ७८९.५० कोटी निधी मंजूर झाला असून सर्वात कमी निधी शिरीष चौधरी यांच्या काळातच मंजूर आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात सन २०१०-११ मध्ये ४० कोटी, सन २०११-१२ मध्ये ३५ कोटी, सन २०१२-१३ मध्ये २५ कोटी, सन २०१३-१४ मध्ये ४० कोटी, सन २०१४-१५ मध्ये ४७ कोटी निधी मंजूर झाला होता. साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात १८७ कोटी निधी त्यांनी खेचून आणला होता.
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात सन २०१५-१६ मध्ये २० कोटी, सन २०१६-१७ मध्ये फक्त ६ कोटी, सन २०१७-१८ मध्ये २५ कोटी, सन २०१८-१९ मध्ये ३५ कोटी, सन २०१९-२० मध्ये ३२.५० कोटी असा शिरीष चौधरी यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात एकूण ११८.५ कोटी निधी मंजूर झाला होता.
त्यानंतर अनिल पाटील यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात सन २०२०-२१ मध्ये ४० कोटी, सन २०२१-२२ मध्ये १३५ कोटी, सन २०२२-२३ मध्ये ११० कोटी, सन २०२३-२४ मध्ये १०० कोटी, २०२४-२५ मध्ये ९९ कोटी असा निधी मंजूर झाला आहे.
अनिल पाटील यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात
४८४
कोटी
निधी
मंजूर
झाला
आहे.
आपणच धरण पूर्ण करू अश्या वल्गना करणारे माजी आमदार
वास्तविक फुसका बार असून त्यांच्यात निधी खेचून आणण्याची धमक नाही, असा आरोप विरोधकांनी केला असून आकडेवारीकडे पाहिले असता हा आरोप खराच दिसून येत आहे.