सक्षम पर्याय एकचसूत्र भूमिपुत्र : मिलींद भाऊसाहेब
अमळनेर : महायुतीच्या कार्यकाळात अमळनेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला अनिलदादा यांच्या माध्यमातून चांगली गती मिळाली. त्यांच्या माध्यमाने पहिल्यांदाच मतदारसंघाला मंत्री पदाचा बहुमान मिळाला आहे आणि विकल्या गेलाचा डागही पुसला गेला आहे. आगामी कालावधीत अनिलदादांवर मोठ्या जबाबदारीचे संकेत महायुतीच्या सर्वच नेत्यांनी दिलेले आहेत. अनिलदादांमुळे मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधला जाणार असून बुडव्या विरोधकांच्या दुबळ्या पायावर विकासाची स्वप्ने पाहणे व्यर्थ असल्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मिलींद भाऊसाहेब पाटील यांनी म्हटले आहे.
शहादा येथील सातपुडा कारखान्याला ऊस पुरवठा करूनही चौधरीबंधुंनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज फेडले नाही. आश्वासनानंतर आश्वासने दिली आणि ती पाळली नाहीत. त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली, मात्र तरीही ते निवडणुकीत उभे आहेत. अत्यंत खोटी आश्वासने देणाऱ्यांचा शेतकऱ्यांना अतिशय धक्कादायक अनुभव दिला आहे. त्यांच्याकडे अनेक दारूची दुकाने, बीअर बार, हॉटेल्स आहेत. या कारखान्यातून त्यांनी त्यांच्यासाठी डिस्टिलरी चालवली. तिथून दारू जात होती. इथेनॉलचे उत्पादनही सुरू झाले. त्यामुळे त्यांना बक्कड नफा झाला पण त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यांच्यावर गुजरात राज्यात गुन्हे दाखल असून ते फरार घोषीत आहेत.
रवींद्र चौधरी यांनी तर दोन खोटे धनादेश दिले. त्याच्यांवर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज असल्याने त्यांची बँकांकडील पत संपली आहे. प्रस्तावित राजमाता जिजाऊ सुतगिरणीतही महाघोटाळा केला आहे. यामुळे त्यांची सामाजिक आणि राजकीय विश्वासार्हताही संपली असूून अशा बुडव्या विरोधकांच्या दुबळ्या पायावर विकासाची स्वप्ने पाहणे व्यर्थ आहे. शिरीष चौधरी हे आपण अमळगावचे असल्याचे सांगतात. त्या अमळगावसाठी त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात काय कामे केली ती सांगावित. मी अनिलदादांनी अमळगावसाठी काय कामे केली त्याची यादी देतो असे आव्हानही भाऊसाहेबांनी दिले आहे. लोकांनी सारासार विचार करून अमळनेरच्या विकासाच्या रथाला मोगरी लावणाऱ्यांची स्वप्ने उधळून लावावी. भूमिपुत्र अनिलदादा यांना भरघोस मतांनी निवडून आणावे अशी साद मिलींद भाऊसाहेब यांनी अमळनेर मतदारसंघवासीयांना घातली आहे.