नंतरच्या काळात मात्र जोपासतात आपापले हितसंबंध, डॉ. अनिल शिंदे यांनी केला आरोप
अमळनेर:- अमळनेर विधानसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापले असून आजी माजी आमदार एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. आता कार्यकर्त्यांची माथी भडकावणारे हे दोघे निवडणूक संपल्यावर आपापले हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप डॉ. अनिल शिंदे यांनी केला आहे.
सध्या चौधरी बंधूनी सूतगिरणीत भ्रष्टाचार केल्याचे पुरावे शहरभर लागले आहेत. त्यानंतर मंत्र्यांनी गौण खनिज प्रकरणात मोठा माल गडप केल्याचा दावा चौधरी गटाने केला आहे. आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण तापले असून एकमेकांची उणीदुणी दोन्ही उमेदवार मग्न आहेत. मात्र निवडून आल्यावर काय करणार याचा वचननामा ते जनतेसमोर हेतुपुरस्सर मांडत नाहीत. आता एकमेकांवर आरोप करत असलेले मंत्री पाटील आणि शिरीष चौधरी हे आपापले हितसंबंधांना तडा जाऊ देत नाहीत. शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात अनिल पाटील यांनीच कोट्यवधींच्या कामाचे ठेके घेतल्याचे चौधरी यांनी समोर आणले होते. तसेच शहादा साखर कारखान्यातील फसवणुकीप्रकरणी अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अनिल पाटील यांनी त्यावेळी चौधरी यांच्या विरोधात कोणतीही कडक पाऊले उचलली नाहीत. त्यामागे काही अर्थपूर्ण कारण होते का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जनतेला मूर्ख समजण्याचा प्रकार आजी माजी करत असले तरी आता तालुक्याचे नागरिक हुशार झाले आहेत. हे या आजी माजी जोडगोळीने विसरू नये असे डॉ. अनिल शिंदे यांनी सांगितले आहे.