अमळनेर: स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे वार्षिक खेळ महोत्सव “स्पोर्ट्स डे” धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या उत्सवाची शानदार सुरुवात अमळनेर शहराचे पोलीस उपनिरीक्षक श्री पिंगळे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हवेत फुगे सोडून करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायक मशाल दौड आणि पथसंचलनाने झाली. या वेळी शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल आणि शितिका अग्रवाल यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेरचे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू संजय पवार व सुनील वाघ, संजय पाटील हे देखील उपस्थित होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल्स व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा महोत्सवातील उत्साह, आनंद आणि क्रीडा वृत्तीने सगळ्यांना प्रभावित केले.पालकांचंही या महोत्सवात योगदान महत्त्वाचं होतं, कारण त्यांनी आपल्या मुलांचा उत्साहवर्धन करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी खेळ खेळून, तसेच काहींनी प्रेक्षक म्हणून खेळ पाहत महोत्सवाचा पूर्ण आनंद लुटला.