अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर:- येथील ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे सन 2023- 24 मध्ये राबविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कृषी विभागाकडून तृणधान्याचे सॅम्पल विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले तसेच तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी मार्गदर्शन केले. आहार तज्ञ डॉक्टर अपर्णा मुठे यांनी यावेळी तृणधान्यातील असणाऱ्या शरीराला आवश्यक असणाऱ्या अशा सर्व घटकांबाबत सविस्तर माहिती दिली. व मुलांना समजेल अशा भाषेत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळवून घेतला.यावेळी ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या विद्या मॅडम यांनी देखील तृणधान्यातील असणाऱ्या घटकांबाबत सखोल माहिती दिली व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून आहारातील तृणधान्याचा वापराबद्दल रोज एकतरी तृणधान्य आहारात समावेश करेल अशी शपथ घेऊन घेतल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्लोबल शाळेचे पर्यवेक्षक राकेश शर्मा सर यांनी केले.यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, दीपक चौधरी, योगेश खैरनार, प्रवीण पाटील तसेच कृषी सहाय्यक दिनेश पाटील अनिकेत सूर्यवंशी निशा सोनवणे यांचा सह कृषी विभागातील सर्व कर्मचारी तसेच ग्लोबल इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.