अमळनेर : तालुक्यातून नगाव येथून १४ वर्षाची मुलगी ९ रोजी रात्री ते १० रोजी पहाटे बेपत्ता झाली असून मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नगाव येथील १३ वर्ष ८ महिने वयाच्या बलिकेची आई मयत झाली असल्याने ती आजीसोबत राहत होती. ९ रोजी रात्री १० वाजता टीव्ही पाहून ती आपल्या आजीजवळ झोपली होती. १० रोजी पहाटे १ वाजता मुलीची आजी बांधलेल्या बकऱ्या बघायला उठली असता तिला नात दिसून आली नाही. तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.