अमळनेर : तालुक्यातील लाडक्या भावांना तीन महिन्यांपासून मोबदला नाही आणि शासन भेदभाव करते याबाबत मीडियाने वृत्त प्रसिद्ध करताच लाडक्या भावांच्या खात्यावर पैसे पडणे सुरू झाले.
लाडक्या बहिणींना याप्रमाणे शासनाने १५०० रुपये मानधन जाहीर केले होते . त्याप्रमाणे लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगार युवकासाठी १२ वि पास ६ हजार रुपये प्रतिमाहिना , आयटीआय पदविका प्रतिमाहिना ८ हजार रुपये आणि पदवी पदव्युत्तर उमेदवाराला १० हजार रुपये जाहीर केले होते. मात्र तीन महिन्यापासून काम करून सुद्धा युवकाना मोबदला देण्यात आला नाही. या युवकांना मोबदला देण्याची जबाबदारी कौशल्य विकास रोजगार आयुक्तांवर टाकण्यात आली होती.
लाडक्या भावांमध्ये नाराजी पसरली होती. याबाबत मीडियाने वृत्त प्रसिद्ध करताच विविध विभागातील लाडक्या भावांच्या खात्यावर पैसे पडणे सुरू झाले. यामुळे लाडक्या भावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून मीडियाचे आभार मानले आहेत.