अमळनेर:- शहरातील बस स्टँड ते चोपडा नाका दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी दरवाज्याजवळ व विविध ठिकाणी भूमिगत गटारीवर लावलेल्या जाळ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामूळे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
अमळनेर शहरात येणारी सर्व वाहतूक येथूनच होत असते. त्या जाळ्यांना असलेले लोखंड तुटल्याने दररोज दोन ते तीन नागरिकांचा अपघात होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासन यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असून मुख्य मार्गावर असे खड्डे पडलेले असून जाळ्या तुटलेल्या आहेत. त्याठिकाणी मोठा अपघात झाल्यास कोण जबाबदार असेल असा सवाल प्रवाशी व नागरिक विचारत असून सदर जाळ्या तात्काळ बदलून घ्याव्यात अशी मागणी होत आहे.