शेतीपयोगी साहित्य, कृषी औजारे, साहित्याचे लावले होते स्टॉल…
अमळनेर:- येथे इंदिरा शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत तालुका कृषी विभागातर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक योजनांची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या निर्देशानुसार शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेतीपयोगी साहित्य, कृषी औजारे, सूक्ष्म सिंचनाचे साहित्य, ट्रॅक्टर आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी डी. व्ही. जाधवर होते. तालुक्यातील डीलर्स असोसिएशनचे प्रतिनिधी संदीप बोरसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी केले. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, भाऊसाहेब पांडुरंग फुंडकर लागवड योजना, तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न उन्नयन योजना यांचा लाभ घेण्याचे मोठ्या प्रमाणावर घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. यावेळी विविध कंपन्यांचे स्टॉल्स मध्ये त्यांचे विक्री साधने, शेती उपयोगी अवजारे शेतकऱ्यांना मेळाव्याच्या एका छताखाली पाहावयास मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाला असंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावत शेती विषयक योजनाची माहिती व प्रत्यक्ष शेती संसाधने अनुभवली. यावेळी तालुका कार्यालयाचे कृषी अधिकारी सोनाली सोनवणे, कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार, अमोल कोठावदे, योगेश वंजारी, योगेश खैरनार, राकेश साळुंखे यांच्यासह सर्व कृषी सहाय्यक यावेळी उपस्थित होते.