
अमळनेर रेल्वे स्थानकास दिली भेट,अनेक समस्यांवर केली चर्चा
अमळनेर -सती माता जवळील रेल्वे बोगद्यात वारंवार वाचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी एक फूट पंप उचलून हे पाणी नजीकच्या चिखली नदीत सोडण्यासाठी उपयोजना करणार असल्याची ग्वाही रेल्वेचे मुंबई विभागाचे डी. एम.पंकजसिंग यांनी अमळनेर भेटीत खासदार स्मिता वाघ यांना दिली.

डी एम पंकजसिंग हे प्रथमच अमळनेर स्थानकाच्या भेटीसाठी दाखल झाले होते,मकर संक्रातीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता स्पेशल एक बोगी च्या सलून ट्रेन ने त्यांचे आगमन झाले.त्यांच्या सोबत 50 अधिकारी वर्गाचा ताफा होता.प्रत्यक्षात झोन निरीक्षण, सेफटी ऑडिट यासारख्या अंतर्गत कामासाठी ही व्हिजिट असताना यावेळी समस्या मांडण्यासाठी खासदार स्मिता वाघ,माजी झेड आर यु सी सी मेंबर प्रीतपालसिंग बग्गा यांचेसह प्रवासी संघाची मंडळी उपस्थित असल्याने पंकज सिंग यांनी त्यांना वेळ देऊन सुमारे दीड तास चर्चा केली.यावेळी झालेंल्या बैठकीत सती माता जवळील रेल्वे बोगद्यातील पाण्याचा कायमचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे,दुसऱ्या प्लॅट फॉर्म जवळील सिमेंट रॅक मुळे प्रवाश्यांना त्रास होत असल्याने हा रॅक अन्य ठिकाणी हलविणे,स्टेशन समांतर रॅम्प तयार करणे,अमळनेर मार्गे पुणे भुसावळ नवीन गाडी सुरू करणे,दररोज सकाळी 7 वाजता चाकरमान्यांना जळगाव जाण्यासाठी पॅसेंजर गाडी सुरू करणे, स्टेशनवर आवश्यक सुविधा देणे, रामेश्वरम,प्रेरणा, ओखापूरी यासारख्या न थांबणाऱ्या गाड्यांना अमळनेर स्थानकावर थांबा देणे.आदी समस्या मांडून त्यावर चर्चा करण्यात आली.यावर पंकज सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यातील शक्य होतील तेवढ्या समस्या सोडविण्याची ग्वाही खासदार स्मिता वाघ यांना दिली.यावेळी स्टेशनची लिफ्ट लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.स्टेशन पाहणी नंतर नंदुरबार कडे ते रवाना झाले.
याप्रसंगी प्रीतपालसिंग बग्गा,निर्मल कोचर,मुन्ना शर्मा, उमेश वाल्हे,राकेश पाटील,स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे उपस्थित होते.
