
अमळनेर -शहरात गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात जनरल फिजिशियन म्हणून उकृष्ठ रुग्णसेवा देणारे डॉ मिलिंद नवसारीकर स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.”आरोग्य धनसंपदा” पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कुलच्या वार्षिक स्नेह संमेलनात परिविक्षाधीन आयएएस अधिकारी वेवो केजो तोलू,माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,बजरंगलाल अग्रवाल,प्रा डी डी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ नवसारीकर यांना सपत्नीक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ नवसारीकर यांनी डॉ जवंजाळ यांना गुरुस्थानी मानून त्यांचे सहकारी बनत 5 वर्ष प्रताप धर्मार्थ रुग्णालयात आरोग्यदानाचे काम केले.शहरात अनेक हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या सर्जरीसाठी सहकारी म्हणून कार्यरत असतात,लायन्स क्लब च्या माध्यमातून समाजसेवा व विविध आरोग्य शिबिरात सेवा देतात.प्रताप महाविद्यालयात मेडिकल ऑफिसर म्हणून समाज सेवा, रात्री अपरात्री रुग्णाच्या सेवे साठी धावून जाणे.आदी सेवाभावी कार्य पाहता श्रीमंत प्रताप शेठ चॅरिटेबल फाऊंडेशन अमळनेर तर्फे मातोश्री सुंदराबाई बन्सीलाल अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद विशिष्ठ सेवा पुरस्कारासाठी समिती मार्फत त्यांची निवड झाली होती.
सदर पुरस्कार वितरण प्रसंगी स्कुलचे चेअरमन नीरज अग्रवाल, प्राचार्य विनोद अमृतकर,पदाधिकारी सीतीका अग्रवाल,ममता अग्रवाल यासह मान्यवर उपस्थित होते.सदर पुरस्काराबद्दल डॉ नवसारीकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
