![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1715356415-1737595686948.jpg?fit=1024%2C682&ssl=1)
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ 21 जानेवारी 2025 रोजी चिमनपुरी पिंपळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हे शिबीर 21 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा निंबा दला चौधरी तंटामुक्त अध्यक्ष पिंपळे यांच्या हस्ते पार पडला.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. जैन यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. धीरज वैष्णव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.महिला लोकनियुक्त सरपंच सौ. वर्षाताई युवराज पाटील यांनी देखील उपस्थित राहून शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांचे कौतुक केले व त्यांना समाजाभिमुख कार्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. हेमंत पवार यांच्या प्रास्ताविकाने झाली. शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला असून, समाजाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये मधुमेह तपासणी शिबीर, मतदान व एड्स जनजागृती, सहज योग ध्यान शिबीर, रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम, तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री जाधव यांनी तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. सुनील राजपूत यांनी आभार प्रदर्शन करत या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
संपूर्ण शिबिरात स्वयंसेवकांनी श्रमसंस्काराच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते युवराज डी पाटील ,गोकुळ पाटील,मानसी चौधरी, यशोदीप पाटील,व मान्यवरांनी या उपक्रमांचे कौतुक केले असून शिबिराच्या पुढील दिवसांमध्ये मोठ्या उत्साहाने विविध उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1945045255-17373389785377574354205967647335.jpg?resize=640%2C815&ssl=1)