अमळनेर -निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चा भव्य भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 4.00 वाजता श्री.चक्रधर स्वामी मंदिरा जवळ खेडी (वासरे) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती स्मिताताई वाघ,खासदार- जळगाव लोकसभा या उपस्थित राहणार आहे. सदर शासकीय उपसा सिंचन मतदार संघातील शेतकरी बांधवांसाठी जनसंजीवनी ठरणारी असल्याने आमदार अनिल पाटील यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून आठ दिवसांपूर्वी योजना 3 व 4 चे भूमिपूजन होऊन वेगाने काम सुरू झाले आहे,आता पुन्हा 1 व 2 चे भूमीपूजन झाल्यानंतर या कामाला देखील वेग येणार आहे.तरी सदर भूमीपूजन प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांनी तसेच अमळनेर मतदारसंघातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय उपसा सिंचन योजना 3 व 4 चे गांधली येथे भूमिपूजनअमळनेर- निम्न तापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात 25 हजार हेक्टर म्हणजेच सुमारे 70 ते 75 हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढलेला असेल, यामुळे शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावणार आहे. मी काम…
शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनअमळनेर- आपले धरण तर होणारच आहे, मात्र धरणाचे पाणी थेट शेतात पोहोचविण्यासाठी उपसा सिंचन योजनेसारखी पाईपलाईनद्वारे शेतात पाणी पोहोचविणारी राजस्थानची टेक्नॉलॉजी आपण आणली असून या टेक्नॉंलॉजीमुळे नक्कीच मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या जीवनात नवी संजीवनी येईल अशी…
तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी पोहचणार अमळनेर-तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात झाली असून यामाध्यमातून तापीवर पाडळसरे येथे 841.74 कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे,ज्यापद्धतीने घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळते त्याचपद्धतीने थेट प्रत्येकाच्या शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी…