
अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील कायमस्वरूपी सेवेतून काढण्यात आलेल्या ६५ होमगार्ड ला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिले आहेत. यात अमळनेर तालुक्याच्या ११ होमगार्ड चा समावेश आहे.

खासदार स्मिता वाघ यांनी होमगार्ड ला कामावर घेण्यासाठी अशोक नखाते याना पत्र दिले होते. निवडणूक बंदोबस्ताचे कर्तव्य केले नाही म्हणून जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील दत्तात्रय बळवन्त चव्हाण ,समाधान सुरेश पाटील, संदीप रमेश पाटील , पुनमचंद सुकलाल हटकर , किशोर सुरेश पाटील , हितेश संजय पाटील , देविदास पांडू नेरकर , राहुल रघुवीर भालडे , दीपक यशवंत सातपुते , श्रीराम रतनसिंग राठोड , विष्णू वसंत शेटे याना निवडणूक बंदोबस्त कर्तव्य केले नाही म्हणून अशोक नखाते यांनी होमगार्ड अधिनियम १९४० च्या कलम ६(ब) ,२ प्रमाणे सेवा समाप्तीचे आदेश दिले होते. याबाबत सेवा समाप्ती केलेल्या होमगार्ड नी अपील केले होते. तसेच खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील याच्याकडे तक्रार केली होती. कोणतीही नोटीस न देता सरळ सेवेतून काढले . त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना परत कामावर घ्या असे पत्र खा वाघ व आमदार अनिल पाटील यांनी दिले होते. यावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी त्या सर्व कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आदेश दिले आहेत. जळगाव , चाळीसगाव , भडगाव , जामनेर, रावेर , धरणगाव , सावदा , पाचोरा ,भुसावळ , यावल ,वरणगाव येथील होमगार्ड चा समावेश आहे.