
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाविषयी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी नागरिकांना माहिती दिली.

भारतातील वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट शासनाने सक्तीचे केलेले . तरी देखिल दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाही. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढून मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शासनाने रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविले असून प्रत्येक नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ.पवन पाटील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अनेक स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.