
अमळनेर : पू सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या संचालक मंडळाने अध्यक्ष सुशील भदाणे यांच्या नेतृत्वाखाली १ फेब्रुवारी पासून सभासद हिताचा निर्णय घेतला आहे. कर्ज मर्यादेत वाढ करून व्याजदर कमी केले आहेत. तसेच कर्ज फेड कालावधी देखील वाढवला आहे.

यापूर्वी जामीन कर्ज ६ लाख मिळत होते. कर्ज फेड ७२ महिने होते तर व्याज दर ८ टक्के होते. आता नवीन सुधारणा जामीन कर्ज मर्यादा वाढवून ७ लाख केली आहे. कर्ज फेड ८४ महिने तर नवीन व्याज दर कमी करून ७.५ टक्के केले आहे.
आकस्मित कर्ज योजनेत आधी विशेष कर्ज ५ लाख मिळत होते. कर्ज फेड ६० महिने होते. व्याजदर ९.५ टक्के होते. आता नवीन सुधारणा करून विशेष कर्ज मर्यादा वाढवून ६ लाख केली आहे. कर्ज फेड ७२ महिने करून नवीन व्याज दर ९ टक्के केली आहे.
पतपेढीचे अध्यक्ष सुशील भदाणे व संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय सभासदांना फायदेशीर ठरणार आहे. जास्त कर्ज मिळेल आणि फेड करतांना अवघड जाणार नाही. इतर संस्थांच्या तुलनेत व्याज दर कमी असणार आहे.