
उन्हाळी शिबिरासह विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे केले कौतुक…
अमळनेर:- येथील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचलित, सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, मंगरूळ येथे शहरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामधे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, शारीरिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ह्या निमित्ताने जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात क्रिडा व शिक्षणाचे महत्व पटवून देत संस्थेने चालविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा, मा. जि. प सदस्य ॲड.व्हि आर पाटील, दुध संघाच्या संचालक भैरवी वाघ पलांडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, चाळीसगावंचे नगरसेवक नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन, प्राचार्या डॉ.मंजुळा नायर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बिऱ्हाडे यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




