
वणी गावाजवळ कथित गोरक्षकांनी खिळ्यांचा रॉड टाकून टायर पंक्चर केले…
अमळनेर : येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रिता भुपेंद्र बाविस्कर यांच्या कार मध्ये लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून हल्ला केल्याची घटना धुळे तालुक्यातील वणी गावाजवळ घडली.

महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिती उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई च्या सदस्या अमळनेर येथील विद्यानगर च्या रहिवाशी रिता भुपेंद्र बाविस्कर या आपल्या भावासोबत १२ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चार चाकी क्रमांक एम एच ५४ बी ४३०० हिच्यावर मुंबई जाण्यासाठी निघाले होते. गावाबाहेर मंगरूळ येथून त्यांच्या चारचाकीचा वाहन क्रमांक एम एच ०२ बी आय १९०२ व मोटरसायकलवर दोन जण हिच्यावर पाठलाग सुरू केला. सुमारे सव्वा तीन वाजेच्या सुमारास वणी गावाजवळ वळणार तिघांनी ओव्हरटेक करत चार चाकीच्या मागच्या व पुढच्या टायर मध्ये लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून गाडी पंक्चर केली आणि हल्ला करून गाडीची तोडफोड केली. रिता बाविस्कर यांनी तातडीने ११२ डायल केले आणि आपल्या मुलीला देखील घाबरून फोन केला. हल्लेखोर आणि बाविस्कर व त्यांचा चालक यांच्यात वाद झाले तेव्हा हल्लेखोरांनी आम्ही गोरक्षक असून आम्हाला गाडीत गाय असल्याचा संशय आला असे सांगितले. धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तातडीने पोलिसांना रवाना करून संबंधित आरोपीना अटक केली असून आरोपी मिलिंद पाटील रा वरखेडी , सौरभ जाधव रा दंडेवाला बाबा नगर मोहाडी उपनगर धुळे , प्रमोद देविदास सोनवणे रा बाळापूर अशी असल्याचे समजले. धुळे तालुका पोलीस स्टेशनला भारतीय न्यायासंहिता कलम ११० ,३२४(४) ,३२४(६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत. दरम्यान घटनेची आमदार अनिल पाटील , खासदार स्मिता वाघ यांनी देखील दखल घेतली आहे.




