
अमळनेर : पिकअप व्हॅन मध्ये बैल दाटीवाटीने भरून नेणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरांसह पिकअप व्हॅन असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

११ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही गो रक्षकांनी गलवाडे रस्त्यावर जे पी हॉटेल जवळ तीन वाहनांमध्ये गुरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती दिली. वाहने अडवून ठेवण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन तिन्ही वाहने पोलीस स्टेशनला जमा करून खात्री केली असता ती गुरे शेतकऱ्यांची असल्याची खात्री झाली. त्यात एका वाहनात दोन एकात एक एकांत चार असे बैल भरलेले आढळून आले. गणेश डिगंबर पाटील रा शिरसमणी ता पारोळा यांनी त्यांच्या पीक अप व्हॅन क्रमांक एम एच १९ ,सी वाय ६६९४ मध्ये चार गुरे दाटीवाटीने कोंबून भरली होती म्हणून यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे सांगण्यात आले. वाहतूक पोलीस संजय बोरसे यांनी फिर्याद दिल्यावरून गणेश पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१)(ड)(ई)(फ) (क) प्रमाणे तसेच मुंबई पोलिस कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन लाख ५० हजाराचे वाहन आणि १ लाख ९० हजार रुपयांचे चार बैल जप्त करण्यात आले. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.




