
अमळनेर:- तालुक्यातील ढेकू रस्त्यावरील गुलमोहर कॉलनीच्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून नगापालिकेने तात्काळ लक्ष देवून रस्ता स्वच्छ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी केलेली आहे.
परिसरातील नागरीकांनी अनेकवेळा नगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा नगरपालिका कचरा उचलयाला तयार नाही. रस्त्यावरील घाणीमुळे डासांची उत्पत्ती होवून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. नगरपालिकेकडे शेकडो सफाई कर्मचारी असतांना नेहमीच दुर्लक्ष होत असल्यामुळे लवकरात लवकर गुलमोहर कॉलनी समोरील कचरा उचलला गेला नाही तर जिल्हाधिकरी कार्यालयात तक्रार करणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले आहे.