
अमळनेर:- अमळनेर तालुका मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुदीप साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतीच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटनेची बैठक पार पडली या बैठकीत तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी सुदीप भगवंतराव साळुंखे, उपाध्यक्षपदी दीपक पाटील, प्रदीप खैरनार, पंचशीला सैंदाणे, सचिव तुषार रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष दिपाली पाटील, सल्लागार म्हणून निलेश शेषराव बोरसे यांसह सदस्य म्हणून योगिता पाटील, वेदिका खैरनार, मोहिनी रत्नपारखी, हेमंत पाटील, अरुण पाटील, जगतसिंग शिंदे, पूनम बोरसे, कविता पाटील, मनिषा राजपूत, यशोदीप पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शासनाने सुरुवातीला युवा प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ सहा महिने ठरवला होता परंतु नुकताच अधिवेशनात पुन्हा पाच महिनेची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यावेळी सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थी यांना येणाऱ्या अडी अडचणी व समस्या सोडविण्यासाठी या संघटनेच्या पदाधिकारी निवड करण्यात आली. तसेच पुढे कार्यकाळ वाढविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा चालू ठेवु व तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थी सोबत खंबीर पणे उभे राहु अशी ग्वाही संघटनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी शिक्षक व शिक्षिका यांनी दिली तसेच तालुका अध्यक्ष पदी सुदीप साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल संघटनेचे वतीने त्यांचे व सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.