
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आदेश…
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे शेतात जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या घरकुलांचे काम थांबवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तालुक्यातील जवखेडा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यावरच दोन घरकुल बांधले जात होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत तक्रार करून देखील दखल घेतली नाही म्हणून अखेर सुनील पाटील , नीलकंठ पाटील , मालतीबाई पाटील , चंद्रभान पाटील , रवींद्र पाटील , अशोक पाटील , युवराज पाटील , विजय पाटील , प्रफुल्ल पाटील , अनिता बोरसे , सुधाकर पाटील , राजेंद्र पाटील , दिलीप पाटील , आखाडू भिल , वासुदेव पाटील , सुनीता पाटील ,दुर्गेश पाटील यांनी निवेदन देऊन शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची भेट घेतली व रस्त्यात घरे बांधल्यास शेतकऱ्यांना येण्या जाण्यास अडचणीचे ठरेल म्हणून व्यथा मांडली. यावर प्रांताधिकारी मुंडावरे गटविकास अधिकारी एन आर पाटील यांना घरकुल काम थांबवण्याचे आदेश दिले. तर गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी तात्काळ ग्रामसेवकला काम थाम्बवण्याचे आदेश दिले आहेत.