
अमळनेर : अहिल्यादेवीनगर येथे पार पडलेल्या मोतीलाल फिरोदिया राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमळनेर येथील सात वर्षाचा मृगांक सागर पाटील याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.

अहिल्यानगर येथे ७ मे ते ११ मे दरम्यान राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. मृगांक हा स्वामीविवेकानंद स्कूल चा विद्यार्थी असून तो डॉक्टर सागर पाटील व प्रा प्रियंका पाटील यांचा मुलगा आहे. त्याला चषक ,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे बक्षीस देण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल माजी मंत्री अनिल पाटील , प्राचार्य , क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.






