
अमळनेर– तालुक्यातील मांडळ येथे आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मांडळ सन 2001 – 2002 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 9 मे 2025 रोजी रंगला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला 60 ते 65 विद्यार्थीनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मांडळ येथील मुख्याध्यापक बी. बी.चव्हाण सर, पुरकर सर,माळी सर, दोरीक सर, किरण सर, बी.बी. पाटील सर, व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूरकर सर यांना देण्यात आले होते.कार्यक्रमाच्या वेळी पूरकर सरांनी व किरण सरांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. कार्यक्रमाला सन 2001 – 2002 बॅच मधील विद्यार्थ्यांनी शाळेला प्रोजेक्टर देण्याचे संकल्प केला आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक काशिनाथ बडगुजर, हबीब इसुफ शय्येद, चेतन विनायक बडगुजर, दीपक आनंदा पाटकरी, जितेंद्र जयवंत महाजन, रावसाहेब वामन पाटील, विशाल पाटील, भूषण भालेराव , वैशाली पाटील, कल्पना पाटील , वर्षा पाटील , मंगल मराठे, आशा पाटील, धनश्री पाटील, कविता पाटील, कविता ललवाणी, प्रविन मगरे, सुनील कोळी, चतुर कोळी, जितेंद्र कोळी, जितेंद्र पाटील, मुकुंद गोसावी, केतन गोसावी, वंदना शिरसाठ, अंजना परदेशी, दक्षता पाटील, मनीषा वडीले, शितल पाटील, आरिफ शेख , मोहंमद शेख, समाधान सैदाने, बापू गांगुर्डे, कैलास पाटील, पांडुरंग कोळी, भूषण पाटील, राकेश बडगुजर, अतुल बडगुजर, अर्चना पाटिल, विनोद पाटील, दीपक शिरसाठ, जितेंद्र सैदाने, मनोज भिल, दीपक चव्हाण, अब्जाल शेख, फरीद पठाण यांनी परिश्रम घेतले.


