
पक्षीमित्र अश्विन पाटील व जायंट्स ग्रुपचा संयुक्त उपक्रम…
अमळनेर:- तालुक्यातील जळोद येथील जिल्हा परिषद शाळेत जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे पक्षीमित्र अश्विन पाटील सर यांनी पक्षी संवाद कार्यशाळा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मातीचे परळ वाटप करण्यात आले.
या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन पक्षीमित्र अश्विन लिलाचंद पाटील यांनी सुमारे 200 विद्यार्थ्यांना स्मार्ट टिव्हीच्या माध्यमातून पक्षी जगताबद्दल मार्गदर्शन केले.यात पक्षी यांचा मनुष्य ,पर्यावरण,अन्नसाखळी, जंगल निर्मिती, शेतकरी यांच्यासाठी काय योगदान आहे याचे महत्त्व पटून त्यांच्या विविध लकबी व आवाज काढून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.सदर कार्यक्रम प्रसंगी जायंट्स ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुनिल पाटील, सचिव संदीप महाजन, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, मार्गदर्शक प्रवीण भावसार सर, अॅड राजेंद्र चौधरी, रमेश महाजन, व सदस्य प्रदीप शिंगाणे, रवींद्र पाटील या सदस्यांनी या कामात सहकार्य करून उपक्रम यशस्वी केला. कार्यक्रमा नंतर उपस्थित विद्यार्थ्यांना पक्षांना उन्हाळ्यात थंड पाणी मिळावे यासाठी १०५ मातीचे भांडे (परळ) गृपतर्फे वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमासाठी जि.प.जळोद शाळेतील कार्यरत शिक्षक ज्ञानेश्वर भाईदास कुवर (मुख्याध्यापक), सुनिल श्रावण पाटील, नरेश आत्माराम शिरसाठ, सदाशिव पौलाद पवार, सुरेखा यशवंत पाटील, जयश्री दिलीप पवार, कल्पना प्रकाश पवार, यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच शालेय स्थानिक समिती अध्यक्ष सतीलालभोई, व दीपक चौधरी यांचे ही सहकार्य लाभले.