
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील ४५ वर्षीय इसम मध्य प्रदेश येथून जाऊन येतो सांगून घरातून निघाला मात्र पंधरा दिवस त्याच्याशी संपर्क होत नसल्याने त्याच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

वावडे येथील कापसाचा व्यापार करणारे राजेंद्र भालेराव पाटील (भगवान व्यापारी) हा २९ एप्रिल रोजी मध्यप्रदेशात खेतिया येथे कामानिमित्त जाऊन येतो असे सांगून निघाला. आठ दिवसानंतर त्यांचा फोन बंद येऊ लागला आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने त्याची पत्नीने मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.



