
अमळनेर:- लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी कृषी, शिक्षण, विद्यार्थी, सिंचन, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रात लोककल्याणाची कार्य केली आहेत.यांच्या या कार्याची जनजागृती व्हावी, यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ वर्ल्ड हुमानिटी कमिशन (यूएसए) तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शिक्षक/शिक्षिका गौरव, कृषी गौरव, उद्योग गौरव, युवा गौरव, क्रीडा गौरव, साहित्य गौरव इत्यादी पुरस्कार साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहे.

सदर पुरस्कार धुळे येथे संपन्न होणार आहे आणि विशेष प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने फेटे बांधून आणि इतर सुविधांनी होणार आहे.प्रस्तावसाठी अधिक माहिती साठी संपर्क म्हणून कार्यक्रमाचे संयोजक प्रमोद पाटील ९८८११९४८१६ यांच्याशी संपर्क करावा.



