
हिंदू व मुस्लिम समाजाकडून शीरखुर्मा पार्टीचे आयोजन…
अमळनेर :- तालुक्यातील शिरसाळे येथे रमजान ईद निम्मित सामाजिक एकोपा जपत शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू व मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन ईद साजरी केली. शिरखुर्मा कार्यक्रमास गावातील सरपंच युवराज पाटील, पोलिस कर्मचारी संजय शिरोळे, पोलिस पाटील प्रदीप चव्हाण, जगतराव पाटील, सुदाम चौधरी, रामचंद्र चौधरी, प्रवीण महाले, अलाउद्दीन शेख, इमरान शेख, निसार शेख, आरिफ शेख, फिरोज शेख, कलीम शेख, दानिश शेख अल्ल्युद्दिन खाटीक, रौफ मिस्त्री, विपुल चौधरी, गोरख पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील दोघेही समाजांनी एकत्रित येवून ईद साजरी केल्याने समाजासमोर सामाजिक एकात्मतेचा नवा आदर्श ठेवला आहे.







