एकावर कारवाई करत हातभट्टी व मुद्देमाल केला नष्ट…
अमळनेर:- तालुक्यातील दरेगाव येथे मारवड पोलिसांनी कारवाई करत गावठी दारू तयार करताना एकास पकडुन हातभट्टी नष्ट केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाणे यांनी पो.उ.नि. विनोद पाटील, हे. कॉ. सुनील अगोने, संजय पाटील, पो.ना अनिल राठोड यांना सोबत घेत मिळालेल्या माहितीनुसार दरेगाव येथे छापा टाकला असता गोपाल बापू पवार हा त्याच्या राहत्या घराच्या मागे नाल्याच्या जवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असताना आढळून आला. त्याठिकाणी ५० लिटर पक्के रसायन, ६०० लिटर कच्चे रसायन, १५ लिटर गावठी दारू आदी २१,६०० रू. किमतीचे साहित्य आढळून आले. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. याप्रकरणी पो.ना. अनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ फ, ब, क, ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.