
तहसीलदारांनी तिन्ही मालमत्ता शासन जमा करण्याचे आदेश, इतर अनेक प्रकरणातही कठोर कारवाईची मागणी…
अमळनेर : बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे खरेदी केलेल्या शेतजमिनीचे व्यवहार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी रद्दबातल ठरवून तिन्ही मालमत्ता शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगरूळ येथील मिलिंद पाटील यांनी देखील मंगरूळ येथील कलाबाई परशुराम वैदू यांनी गट न ६२७ बोगस शेतकरी दाखला दाखवून खरेदी केला होता. त्यावर तहसीलदार सुराणा यांनी अनेक प्रकरणे दुय्यम निबंधकाकडून शोधून त्यावर संबंधितांना नोटिसा देऊन सुनावणी घेतली.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कलाबाई वैदू यांनी खरेदी केलेली जमीनीचा खरेदी व्यवहार मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क प्रमाणे रद्द करण्यात आला असून हे क्षेत्र बोजा विरहित शासनाकडे जमा करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे देवगाव देवळी शिवारात गट नम्बर ८/३ हा हरेश सुधाकर मुंदाणकर रा अमलेश्वर नगर माळीवाडा , व यशवंत शिवराम निमपगारे रा चोपदार भुवन यांनी बनावट शेतकरी दाखला तयार करून खरेदी केले होते. तहसीलदार सुराणा यांनी त्यांचे शेतकरी दाखले आणि खरेदी व्यवहार रद्द करून शेतजमीन बोजा विरहित शासनजमा करण्याचे आदेश दिले आहेत.

