
अमळनेर:- तालुक्यातील रंजाणे येथे कृषी विभागाकडून बिजप्रक्रीया कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात कृषी सहाय्यक एम. जी. पवार यांनी जमिनीचे आरोग्य, रासायनिक खतात २० % बचत, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, हुमणी अळी निर्मुलन, निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करणे, बिजप्रक्रीया कशी करावी व त्याचे फायदे या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्यांना बियाणे व रासायनिक खते घ्यावयाची काळजी या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील, गावातील प्रगतीशील शेतकरी प्रकाश धुडकू पाटील, छोटू नीलकंठ पाटील , संभाजी रामदास पाटील, संभाजी सेवकराम पाटील, ज्योतिराम आनंदा पाटील, प्रकाश शिंपी, रावसाहेब रवींद्र पाटील, प्रदीप सुभाष पाटील, तुषार धोबी, भैया ठाकूर, भैया भावराव पाटील, योगेश शिवाजी पाटील व इतर शेतकरी बंधू उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळ कृषि अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांनी परिश्रम घेतले.







