
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.12 वी चा निकाल 93.67% लागला आहे.
इ. 12 वी च्या परीक्षेत कु. बोरसे निकिता प्रदिप (मारवड) हिने 83.00% गुण मिळवुन प्रथम क्रमांक, कु. पाटील दिपिका शांताराम (शहापुर) 80.50% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. साळुंखे साक्षी निळकंठ (तांदळी) हिने 80.33% गुण मिळवून तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




