
स्वामिनी दिपक पाटीलने पटकावला प्रथम क्रमांक…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर सायन्स कॉलेजचा १२ वीचा निकाल १०० टक्के लागला असून स्वामिनी दीपक पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्वामिनी दीपक पाटील (करणखेडा) हिने ८३.३३% गुण मिळवत प्रथम क्रमांक, धनश्री नाना पाटील हिने ८२.३३% गुण मिळवत द्वितीय, अंजली संजय पाटील हिने ८१.३३% मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच चतुर्थ क्रमांक स्नेहा पंकज महाजन (८१.००%) व पाचवा क्रमांक साई नितीन साळुंखे (७९.८६%) यांनी मिळवला आहे. संस्थेचे अध्यक्ष भिकनराव भालेराव पाटील, प्राचार्य व कर्मचारी वृंद यांनी सर्व गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







