अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली.
गांधली येथील जयश्री संजय संदानशिव वय १८ ही बारावीत शिकणारी तरुणी १० रोजी दुपारी कोणालाच काही एक न सांगता घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी तिच्या नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. १२ रोजी दुपारी १२ वाजता जयश्रीच्या वडिलांना सुनील पाटील यांचा फोन आला की गांधली येथीलच धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एक मुलीचा मृतदेह दिसून येत आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाची ओढणी दिसून येत आहे तुम्ही येऊन खात्री करा. तिच्या वडिलांनी खात्री केली असता तो मृतदेह जयश्रीचा असल्याचे समजले. मुलीच्या वडिलांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

